गाताची वाडी शिवारातील शुक्ला वेअर हाऊसिंग गोडावून मधून १८ कट्टे सोयाबीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे तिची बाजार भाव प्रमाणे किंमत ७२ हजार रुपये एवढी आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर बन्सीधर शुक्ला वय ३९ वर्षे, रा. सुभाषनगर बार्शी यांनी या घटनेची फिर्याद तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे, गाताचीवाडी ता. बार्शी येथील शुक्ला अॅग्रो वेअर हाऊसिंग गोडावुनचे लोखंडी खिडकी तोडुन आत प्रवेश करुन १८ सोयाबीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे, या घटनेची फिर्यादीला माहिती वेअर हाऊस चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली, अज्ञात चोरट्याविरुद्ध ३८० व ४६१ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments