शिंदे फडणवीस सरकार घोटाळेबाज व भ्रष्टाचाराची मांदियाळी


शिंदे गट बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडला. शिवसेनेतून  बाहेर पडलेल्या या फुटीर गटाने भाजप सोबत युती करत शिंदे सरकार स्थापन केलं. सरकार स्थापनेनंतर तब्बल 38 दिवसांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला व विरोधकांनी टीकेची झोड उठवली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर सडकून टीका केली आहे.  आज महाराष्ट्रात बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. मागील 40 दिवसांपासून विरोधकांनी आणि जनतेनी आवाज उठवला आणि यातून राज्यातील जनता आक्रोश करेल म्हणून नाईलाजाने हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला, अशी टीका वरपे यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments