सोलापूर! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वारसा स्थळ रॅली


सोलापूर/प्रतिनिधी:

 जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित शनिवारी (दि.१३) सकाळी ७.३० वाजता वारसा स्थळ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वयक चारुशिला देशमुख यांनी झेंडा दाखवून केला. यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

वारसा स्थळ रॅलीमध्ये राष्ट्रीय खेळाडू, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, विविध शाळांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. रॅलीचा मार्ग हुतात्मा चौक चार पुतळा, सुभाष चौक, नवी पेठ, सुपर मार्केट, जुनी मिल चाळ, भैय्या चौक, डॉ. कोटणीस मार्ग असा होता.

रॅलीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी सुधा साळूंखे, म.न.पा. क्रीडाधिकारी नजीर शेख, ३८ महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी सुदाम सैदाडे, भारत स्काउट गाईडचे जिल्हा संघटक श्रीधर मोरे, क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव आदी सामील झाले होते.

Post a Comment

0 Comments