सोलापूर/प्रतिनिधी:
अज्ञात करणाने कट रचून मामानेच भाच्याचा अपहरण करून जीवे ठार मारल्याच्या घटनेची उकल तब्बल १० महिन्यानी करण्यात अक्कलकोट दक्षिण पोलीसांना यश आलेले आहे.
विशेष म्हणजे यात घटनेतील मुख्य सूत्रधार एक पोलीसचंं असल्याची चर्चा असून तालुक्यात या घटनेने खळबळ माजलेली आहे. अभिषेक श्रीमंत राठोड (वय २१ रा. झापू तांडा बोरोटी बु. ता. अक्कलकोट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीसात ५ जणांविरोधात अज्ञात कारणाने कट रचून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेताची विल्हेवाट लावल्याबाबत संशयीत अरोपी विठ्ठल मानसिंग चव्हाण (वय ३१), मोताबाई मानसिंग चव्हाण, बहाद्दुर मानसिंग चव्हाण (वय ४२), विकास प्रकाश राठोड (वय २५ रा. शाबाद जिल्हा गुलबर्गा), सुनिता सुरेश व्हनकेरी (३२ रा. सोलापूर) गणेश व्यंकेटेश राठोड (वय १९ रा. तांदुळवाडी, ता. बरामती जिल्हा पुणे) अक्कलकोट दक्षिण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीसात प्रारंभी मयत युवक अभिषेक श्रीमंत राठोड याचे मिसिंग बाबत अक्कलकोट दक्षिण पोलीसात ११ नोव्हेंबर २०२१ रोजी घटनेची नोंद आहे.
यानंतर दक्षिण पोलीसांनी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप काळे व दक्षिण पोलीसांनी या गंभीर घटनेचे धागेदोरे उकलण्यात यश मिळवले आहे. यातील संशयीत आरोपी बहाद्दुर चव्हाण यास दक्षिण पोलीसांनी १ ऑगस्ट रोजी व आरोपी विकास प्रकाश राठोड यास १ ऑगस्ट रोजी आरोपी सुनिता सुरेश ६ ऑगस्ट रोजी व आरोपी विठ्ठल मानसिंग चव्हाण व गणेश राठोड यास ९ ऑगस्ट रोजी दक्षिण पोलीसांनी अटक केलेली आहे.
या घटनेबाबत अज्ञात कारणाने वरील संशयीत अरोपीने संगनमत करून मयताचे अपहरण करून खून करून प्रेताची परस्पर विल्हेवाट लावली. यातील काही अरोपींना पोलीसांनी ताब्यात घेऊन तपासास सुरूवात केल्यानंतर आरोपीं कडून घटनेची माहिती उकल करण्यात दक्षिण पोलीसांना यश आले आहे. मयताचे प्रेत उकरून व मयत युवकाच्या मिसिंगबाबत असलेले वर्णन मयताच्या अंगावरील कपडे आदीची ओळख पटली आहे.
या घटनेची फिर्याद प्रेमदास श्रीमंत राठोड (वय 22 रा. बोरोटी बु. ता. अक्कलकोट) यांनी दक्षिण पोलीसात दिली आहे. यातील गुन्ह्यातील तपासामध्ये आरोपी विकास प्रकाश राठोड यांनी तपासामध्ये घटनेतील स्थळ दाखवून तपासात माहिती दिली. सदर घटना स्थळी शेतामध्ये प्रेत पुरून ठेवलेले स्थळ दाखवल्यावर पंचनामा करून प्रेत काढण्यात आले.
0 Comments