सोलापूर! अंत्रोळी येथे घरगुती भांडणाच्या रागातून मेहुणा आणि मुलाने केला बापाचा खून; मंद्रूप पोलीसात गुन्ह्याची नोंद



सोलापूर: 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे मयत शिवाजी थोरात वय 55 वर्षे रा.अंत्रोळी,ता.दक्षिण सोलापूर यांने आपली पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने पाठीवर मारले होते.आईला कुर्‍हाडीने मारुन जखमी केले म्हणून मयताचा मुलगा तानाजी शिवाजी थोरात रा.अंत्रोळी ता.दक्षिण सोलापूर यांने वडिलांना झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केले.तसेच बहिणीला कुर्‍हाडीने मारल्याचा राग मनात धरुन मयताचा मेव्हुणा भीमराव रामचंद्र जाधव रा. कंदलगाव ता. दक्षिण सोलापूर यांने मयतास शिवीगाळ करून त्यास लाकडी काठीने दोन्ही हातावर, पायावर, मांडीवर, छातीवर मारहाण करून त्यास जीवे ठार मारले.

सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींवर IPC 302, 324, 342, 504, 34 प्रमाणे मंद्रूप पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments