नवीन मराठी शाळेच्या व्यवस्थापन समितीत निलेश पवार यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड


बार्शी/प्रतिनिधी : 
             
बार्शी येथील नवीन मराठी शाळेतील व्यवस्थापन समिती स्थापित करण्यात आली. दि 01/08/2022 नवीन मराठी शाळा बार्शी येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नूतन उपाध्यक्ष म्हणून श्री निलेश भैय्या पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रसन्न देशपांडे  व सचिव श्री भानुदास लष्कर  यांनी नवीन उपाध्यक्ष श्री निलेश पवार आणि लक्ष्मण वाघमारे, ज्ञानेश्वर खुणे, अबूकर शेख, बाळासाहेब ढेंबरे, राधिका झांबरे, प्रतिभा ढगे, तेजस्विनी बावकर ,जयश्री शेळके, मीरा कुलकर्णी, संजीवनी रोकडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी विक्रम थोरबोले व साक्षी काळे या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
             शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य शिक्षक व विद्यार्थी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली. हर घर तिरंगा हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे समितीने ठरवले शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री भानुदास लष्कर सर यांनी सर्वांचे आभार मानले.

------------------------------------
ऩविन मराठी शाळा ही बार्शी शहरातील अतिशय जुन्या शाळेपैकी व नावाजलेली शाळा असून या शाळेने अनेक उच्च अधिकारी,उद्योजक व कलाकार घडवले आहेत. अशा शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष पदी माजी निवड केल्या बद्दल मी शाळेचा मनापासून आभारी आहे. तसेच माझ्या या पदाच्या कालावधीत शाळेच्या नावारुपाला साजेसे असेच कार्य माझ्या हातून घडेल हा विश्वास मी सर्वांना देतो. व पुनश्च शाळेचा मनापासून अभार व्यक्त करतो.

निलेश पवार,नुतून शाळा व्यवस्थापन समिती ,नविन मराठी  शाळा

Post a Comment

0 Comments