सारख्या मोठ्या शहराला कायमस्वरूपी तलाठी नसल्याने येथील शेतकऱ्यांना व,नागरिकांना नाहक त्रास सोसावं लागत आहे.सोमवार,मंगळवार, शुक्रवार या दिवशी तलाठी उपस्थित असण्याचे फक्त फलक दिसतात पण तलाठी उपस्थित नसतो. तलाठी हा अकलूज चौकातल्या खाजगी गाळ्यामध्ये बसत असून तेथेच खातेदारांना भेटायला बोलावतात. यामुळे मूळ शासकीय कार्यालयात न थांबता दुसरीकडेच खाजगी जागेमध्ये वावरत आहे. स्वप्निल सोनटक्के हे ॲडिशनल तलाठी वेळेवर सापडत नसल्याने गावातल्या लोकांचे व विद्यार्थ्यांचे कामे अडकून राहत आहेत. मुरूम चोरी, बेकायदेशीर वाळू वाहतूकीचे प्रमाण वाढलेले आहे. ॲडिशनल तलाठी असल्यामुळे गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी होत आहे तरी याना अंकुश ठेवता येत नाही.टेंभुर्णी सारख्या बलाढ्य शहरात अधिकाऱ्यांना बदली करून घेण्यासाठी काटेवरची कसरत करावी लागत आहे. भुमाफिया ॲडिशनल तलाठ्यांना हाताखाली घेऊन आपली कामे करून घेत आहेत तसेच तलाठी भूमाफिया यांच्या खाजगी ऑफिसमध्ये बसून घरपोच सेवा पुरवत असल्याची चर्चा लोकांमध्ये होत आहे. तलाठी यांच्याकडे येणारे खातेदार यांना सातबारा दुरुस्तीसाठी काही समस्या असल्यास ते तलाठी यांच्याकडे जातात परंतु तलाठी यांचे मार्फत खातेदारांना तुम्ही आधीच्या तलाठेकडून हे काम का करून घेतले नाहीत असे प्रश्न विचारतात व सदर दुरुस्तीचा अर्ज तहसीलदार यांच्याकडे सादर करावा व तो माझ्याकडे आल्यानंतर मी पाहून घेईल असे उडवाउडवीचे उत्तरे देतात अश्या प्रकारचा कामचुकार व कर्तव्यात कसूर करणारा तलाठी किती दिवस ठेवणार आहेत ,वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेमके कोणती पोळी यांच्यामार्फत भाजून घ्याची आहे का ? असा सवाल नागरीक करत आहे. लवकरच टेंभुर्णी कार्यालयात सदर तलाठी बदलून अन्य ॲडिशनल तलाठी देण्यात यावा अशी त्रस्त नागरिकांची इच्छा आहे.
0 Comments