सोलापूर! शहरात १५ ऑगस्टनंतर दोन दिवसाआड पाणी; हद्दवाढ भागात मात्र तीन दिवसांनी पाणी

सोलापूर/प्रतिनिधी:

 पावसाळ्यामुळे शहर पाणीपुरवठ्याचे सर्व जलस्रोत तुडुंब आहेत. या पार्श्वभूमीवर   शहरात दिवसाआड, दोन तर हद्दवाढ भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. १५ ऑगस्टनंतर यासंदर्भात प्रयत्न होतील, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी सांगितले. हिप्परगा तलाव १०० टक्के भरला आहे. आयुक्त पी. शिवशंकर आणि नगर अभियंता संदीप कारंजे यांनी बधवारी सायंकाळी पाहणी केली तलावाच्या सांडव्यातून नाल्यामध्ये पाणी येणार आहे.

 हिप्परगा तलावातून नैसर्गिक उताराने भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रात पाणी घेतले जाते. या केंद्रातील जलशुध्दीकरण हौदांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. सध्या १५ एमएलडी पाणी घेतले जाते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आणखी पाच एमएलडी पाणी वाढेल. उजनी ते सोलापूर जलवाहिनी आणि टाकळी पंपहाउसमधून मुबलक पाणी येत आहे. जुळे सोलापुरातील दुसरी टाकी भरून घेण्यासाठी आवश्यक कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाने कमी करण्याचा प्रयत्न आहे. यावर पाणीपुरवठा यंत्रणा काम करीत आहे.

Post a Comment

0 Comments