पेठ वडगांव - धनंजय खराडे
पेठ वडगाव मधील शाहू कॉलनी येथील ईरा सोसायटीमध्ये स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत वीर पत्नी श्रीमती शोभा संजय भोसले आणि वीर पत्नी श्रीमती मंगल आनंदा कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला.भारत स्वतंत्र होऊन देशाला ७५ वर्ष पूर्ण झाली सध्या देशात हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात आहे.
स्वातंत्र्य अमृतमहोत्सव निमित्ताने इरा सोसायटी मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे अध्यक्ष दिग्विजय मोहिते,उपाध्यक्ष तन्मय मोरे, तसेच सोसायटी मधील इतर सदस्य सर्वजण उपस्थित होते.
0 Comments