बार्शी शहरातील तुळजापूर रोड येथे कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या दोघांवर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या आर्थिक फायदा करिता आकड्यावर पैशाची पैज लावून कल्याण नावाचा मटका खेळत व खेळवीत असताना दोघेजण आढळून आले, पोलिसांनी जुगारासाठी लागणारे साहित्य, निळ्या शाईचा बॉलपेन व रोख रक्कम जप्त करून अनंत उर्फ लखन संतोष विघ्ने रा. खुरपे बोळ, बार्शी व प्रमोद अंकुश कसबे रा. राणा कॉलनी, बार्शी या दोघा जणांवर महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ (अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती बार्शी शहर पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
0 Comments