अभिजित पाटील यांच्या घरासह कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे; कारखानदारांमध्ये खळबळ

पंढरपूर: 

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या घरासह ऑफीस, कारखाने आणि पतसंस्थांवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. आयकर विभागाने सुरु केलेल्या या छापेमारीमुळे पंढरपूरातील कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

अभिजीत पाटील  यांचे अनेक साखर कारखाने आहेत. पाटील यांनी काहि दिवसांपुर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकत ते कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासह आयकर विभागाकडून पाटील यांच्या पंढरपूर, उस्मानाबाद, धाराशिव अशा अनेक ठिकाणच्या कारखान्यांवर देखील कारवाई सुरु आहे.

दरम्यान अभिजीत पाटील यांच्यावर सुरु झालेल्या छापेमारीमुळे पंढरपूर जिल्ह्यातील साखर उद्योगामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही छापेमारी सुरु असताना त्यांच्या ऑफिसबाहेर मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments