बार्शी/प्रतिनिधी:
कासारवाडी येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी या प्रकरणांमध्ये हलगर्जीपणामुळे महावितरणच्या कनिष्ठ अभियंता व वायरमन यांच्यावर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन जून रोजी कासारवाडी मध्ये झालेल्या विद्युत अपघातामध्ये सतीश शिवाजी गुंड हे जागीच मयत झाले होते तर त्यांचा भाऊ प्रकाश शिवाजी गुंड हा गंभीरित्या जखमी झाला होता. या प्रकरणाला महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दोषी धरत तालुका पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्तव्यात निष्काळजीपणा हाय काय केल्यामुळे एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्यामुळे संभाजी शिवाजी दळवी वय २९ रा.मंडेगाव तालुका बार्शी महेश भगवान शिंगाडे व २४ रा. पाटील प्लॉट बार्शी या दोघा जणांवर भादवि कलम ३०४ अ , ३३८ व ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती २७ ऑगस्ट रोजी तालुका पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
0 Comments