जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावी सैराट सारखी घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री प्रेमीयुगुलापैकी तरुणाचा गोळ्या घालून तर तरुणीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आलाय. राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) आणि वर्षा समाधान कोळी (२०,रा.सुंदरगढी चोपडा) असे या खून झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. या घटनेने चोपडा तालुका हादरला आहे.
राकेश राजपूत आणि वर्षा कोळी यांचे प्रेमसंबंध होते. शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वर्षा हिस पळवून नेण्याच्या उद्देशाने राकेश हा तिच्या घरी आला होता. त्याला पकडून चौघांनी शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. त्यानंतर शहरानजीक असणाऱ्या एका नाल्याजवळ नेवून तिथे त्याचा कपाळात गावठी कट्ट्याने गोळ्या घालून ठार केले. तर बहिणीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला. या घटनेनंतर तरुणीचा अल्पवयीन असलेला भाऊ संशयित आरोपी स्वतःच पोलिसात हजर झाला आणि घडलेली घटना सांगितली. तुषार कोळी, भरत संजय रायसिंग आणि निलेश कोळी अशी इतर संशयित आरोपींची नावे आहेत.
0 Comments