बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा ८० टक्के मिळावा


बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने, गेली वीस दिवसापासून सतत पाऊस पडला आहे तसेच पिकावर गोगलगायी व किडीमुळे ही सोयाबीन पिकाचे ८० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जिल्हा कृषी अधिकारी आणि जिल्हा विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी बार्शी तालुक्यातील पिकाचे पंचनामे करण्यासाठी यावे व सोयाबीन पिकाचे ८० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याने पिक विम्याची रक्कम, नुकसानी प्रमाणे मिळावा या मागणीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना निवेदन देतेवेळी राहुल भड, रणजीत महानवर, युवराज काजळे, संपतराव भड, अशोक पैकेकर, अनिल यादव, बापू भड, कुंडलिक माने, संजय संकपाळ, प्रवीण काकडे, आप्पा कसबे, विठ्ठल दिंडाळे आदी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments