बार्शी! जयंतीच्या वर्गणीच्या पैशाचा हिशोब मागितला म्हणून एकाला कुऱ्हाडीच्या साह्याने मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील सौंदरे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वर्गणी गोळा करण्यात आली होती त्याचा हिशोब मागितल्यामुळे एकाला कुराड लोखंडी रॉड व गजाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जयवंत जय हिंद शिंदे (वय ४० )यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदर्य गावामध्ये फिर्यादीची मोटरसायकल अडवून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा हिशोब मागितल्यामुळे चाकू कुऱ्हाड व लोखंडी गजाच्या साह्याने मारहाण केली आहे, फिर्यादी हे बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. फिर्यादीच्या अर्धा तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्याही लंपास केले आहेत. त्यामुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये १.धनंजय बिभीषण मोरे २. सोनु दौलत मोरे ३.दौलत बिभीषण मोरे ४. लखन बिभीषण मोरे ५. गोविंद लक्ष्मण मोरे ६. पप्पु लक्ष्मण मोरे ७. गोपिनाथ उर्फ गोपाऴ दौलत मोरे व ८ कैलास मनोहर भिसे सर्व रा सौंदरे ता बार्शी जि सोलापूर यांनी मला जीवे ठार मारण्याच्या उददेशाने मारहाण करुन गंभीर जखमी केले म्हणुन  शस्त्र अधिनियम, १९५९ 25 व 4 तसेच भारतीय दंड संहिता १४३, १४७ ,१४८, ३०७,३४१ ,३२७ ३२४, १४९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments