सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती भवानी पेठ येथील प्रभाग क्रमांक ३ मधील जुनी जोडभावी पेठ पोलीस चौकीच्या पाठीमागील वसाहतीत नागरी सुविधांच्या अभावामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.वारंवार प्रशासनाला या संदर्भात विनंती करुन,निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.म्हणून आंदोलनाचा इशारा देऊन देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आज दिनांक ९ ऑगस्ट पासून भर पावसात धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.जोपर्यंत प्रशासन येथील नागरी सुविधां संबंधी दखल घेत नाही,तोपर्यंत सदर आंदोलन चालू राहणार असल्याचे येथील जागरुक नागरिक कल्याण करजगी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या आंदोलनात आप्पा गवळी,गुरुनाथ कोळी,राहुल गुंडला,पुरीषोत्तम मामड्याल,रमेश सिरसिल्ला,श्रीकांत नलगेशी,गौरीशंकर अडगळे,राहुल गंगीशेट्टी,गणेश कोळी,रजनी सिरसिल्ला,अमृता साठे,नरसव्वा उत्कम,भवानी युवा क्रिडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येंने उपस्थित होते
0 Comments