सोलापूर! मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या आठ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी : आमदार प्रणिती शिंदे



सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सोलापूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे व शहर मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या नेतृत्वाखाली "माझा प्रभाग माझी शाखा, या अंतर्गत प्रभाग 28 बापूजी नगर येथे युवक कॉंग्रेस शाखा नामफलकाचे उद्धाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रभाग 28 युवक कॉंग्रेस शाखा अध्यक्षपदी गणेश म्हेत्रे आणि पदाधिकारी म्हणून कुर्मेश बुगले, नीलम माने, परशुराम बुगले यांची निवड करून त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, गेल्या आठ वर्षांपूर्वी जनतेने मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनाला भुलून सत्ता दिली लोकांना वाटले कायापालट होईल पण झाले उलट लोकांना जास्तीत जास्त त्रास कसे होईल असे धोरणे मोदी सरकार राबवित आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई प्रचंड वाढली, पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली, अनेक उद्योग बंद पडत आहेत. या सर्वांचा विचार करून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेची कामे करा त्यांचे अडचणी सोडवावे असे म्हणाले. तसेच बापूजी नगर भागातील नागरिकांनी मला भरभरून मते देऊन तिसऱ्यांदा निवडून दिले हे मी कधीच विसरू शकत नाही बापूजी नगर भागातील सर्व जनतेचे आभारी आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सुद्धा जनतेने कॉंग्रेस पक्षाला साथ द्यावी असे आवाहन आ. प्रणिती शिंदे यांनी केले.

यावेळी जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सोलापूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापुरे, प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, रफिक चकोले, अशोक सायबोलु, दाऊद नदाफ, दिपक फुले, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, श्रीकांत वाडेकर, चौबल मनसावाले, अशोक सायबोलु, सिद्राम टायगर, संजय गायकवाड, राजेंद्र शिरकुल, सुनील सारंगी, यासीन शेख, शब्बीर फुलमामडी, सुभाष वाघमारे, सलमान शेख, अमीर तांबोळी, चंद्रकांत नाईक, अल्पना अभंग, सोनवणे मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments