करीना कपूर तिसऱ्यांदा गरोदर? सैफ सोबतचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल..



बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर  मध्यंतरी एका मुलाखतीत म्हणाली होती की, तिचा नवरा सैफ आली खान वयाच्या प्रत्येक दहा वर्षाच्या टप्प्यात बाप झाला आहे. म्हणजे तो विशीत असताना त्याला मुलगा झाला, मग तिशीत, मग चाळीशीत त्यामुळे आता साठी कडे जाताना तरी मी त्याला बाप होऊ देणार नही असं करीना म्हणाली होती. पण तो विचार बहुदा बदललेला दिसतोय. करीना आणि सैफ त्यांच्या तिसऱ्या मुलाला जन्म जेणार असल्याची जोडणार चर्चा सुरू आहे. नुकताच कारीनाचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये करीनाचे बेबी बंप दिसत आहेत. त्यामुळे आता करीना तिसऱ्यांदा गरोदर आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

करीना सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. करीना कपूरने पती सैफ अली खान आणि आपल्या दोन मुलांसोबत तैमुर आणि जेह यांच्यासोबतचे फोटो देखील शेअर केले आहेत. पण अशात करीनाचा एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामुळे चाहत्यांना भलतीच उत्सुकता लागली आहे. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोवरून करीना पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

करीना कपूर, करिश्मा कपूर आणि त्यांची मैत्रीण अमृता अरोरा देखील त्यांच्यासोबत आहे. करीना कुटुंबा सोबत असताना लंडन येथील एका व्यक्तीसोबत तिने एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये सैफ देखील आहे. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर कमेंट करत अनेकांनी हा प्रश्न केला आहे. मात्र यावर करीना किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. करीनाने शेयर केलेल्या प्रत्येक फोटोत ती आपले पोट लपवत असल्याचे दिसत आहे. त्यावरून हा अंदाज लावण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments