कारी गावामध्ये घर बांधकामाच्या जागेवरून एकाला लोखंडी पाइपाने मारहाण; चौघाविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल


आमच्या जागेमध्ये तुमचे बांधकाम येऊ देऊ नका म्हणत कारी गावांमध्ये एकाला लोखंडी पाईप आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. तानाजी राजेंद्र निंबाळकर, वय-35वर्षे, रा.कारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघा जणांविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी ग्रामपंचायत कडून जागा मोजून घेतली आहे माझ्या जागेमध्ये तुमचे बांधकाम येऊ देऊ नका असे म्हटल्याबरोबर एकाला लोखंडी पाइप आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. 1) मोहन माने, 2) बापू माने, मोहन माने याची बहीण मयडी, 4 ) एक अनोळखी महिला नातेवाईक सर्व रा.कारी, ता. जि. उस्मानाबाद यांनी संगनमत करून आरोपी नंबर 1 याने लोखंडी पाईपाने पाठीवर, डावे दंडावर, उजवे डोळ्यावर, उजवे पायाच्या पिंठरीवर मारहाण करुन आरोपी नंबर 02 ते 04 यांनी हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली आहे. त्यामुळे चौकादाना विरुद्ध भादवी कलम 323, 324, 34, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments