विठ्ठल तुकाराम गुरगुडे वय ४६ वर्ष रा बाभुळगाव ता इंदापुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे सासरे शिवाजी सरडे वय ५७ यांचा २२ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
१९ रोजी ११.३० वा फिर्यादीची पत्नी स्वाती व सासरे शिवाजी विठ्ठल सरडे वय ५७ व रा भिमानगर ता माढा जि सोलापुर हे त्यांचेकडील बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल नं एम एच ४५ यु १६०५ वरून माझी मुलगी उत्कर्शा हिस उक्कडगाव येथे भेटण्यासाठी जात असतांना पांगरी गावचे पुढे बार्शी ते लातुर रोडवर तुळजा भवाजी हटेलच्या जवळ आले असता त्यांचे मोटार सायकलला समोरून येणारी बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल नं एम एच १२ जी बी २३५७ चा चालक भास्कर भानुदास भडकवाड रा सुर्डी ता बार्शी जि सोलापुर याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल भरधाव वेगात रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रंग साईटला येऊन धडकल्याने त्यामध्ये शिवाजी सरडे यांच्या डोकीस व हानवट्टीला जबर मार लागल्याने उपचारा दरम्यान ते मयत झाले आहे. त्यांचे मरणास सायकल नं एम एच
१२ जी बी २३५७ वरील चालक हाच कारणीभुत झाला आहे तसेच सदर अपघातामध्ये आमच्या गाडीचे अंदाजे १० हजाराचे नुकसान केले आहे म्हणुन त्यांच्यावर भारतीय दंड संहिता २८९, 304-A, ४२७ महाराष्ट्र मोटार वाहन नियम कलम १८४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments