सोलापूर/प्रतिनिधी;
ड्रेनेज पाइप लाईनचे काम करण्यास गेले असता मनपा अधिकाऱ्यास स्थानिक नागरिकांकडून मारहाण करण्यात आली आली आहे. यात हकीकत अशी की;इंदिरा नगर, सत्तर फूट रोडला गेंट्याल टॉकीजच्या पाठीमागे बोळात महापालिका ड्रेनेज पाइप लाईनचे काम करण्यास गेले असता मनपा अधिकारी महादेव दत्तात्रय शेरखाने वय ३९ (रा.अशोक नगर, जुळे सोलापूर) यांना तेथील राहणारे स्थानिक नागरिक ८-१०जणांनी मिळून हाताने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याने उजव्या पायास मुक्कामार लागल्याने त्यांना उपचारासाठी सहकर्मचारी वाहिद शेख यांनी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे.
0 Comments