पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर तू येथे का तू आला. या कारणावरून मारहाण करून तिघांच्या खिशातील पैसे काढून घेण्यात आले. ही घटना भोगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील सुखसागर आर्केस्ट्रा बार जवळ पडली.
या प्रकरणात सोलापूर तालुक्याच्या पोलिसांनी भैय्या ऊर्फ संदीप पाटील (रा. पत्रा तालीम) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यासंदर्भात बाबू कन्नू राठोड (वय ४० रा. केकडे नगर मुळेगाव रोड) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या परिचयातील सुरेश राठोड हा पैसे देणार होता. म्हणून ते आपल्या मित्रा सोबत काल शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास भोगाव येथील आर्केस्ट्रा बार जवळ गेले होते. त्या ठिकाणी भैय्या पाटील आणि त्याच्या साथीदारांनी तू येथे का थांबला? अशी शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. आणि त्यांच्या खिशातील २६ हजार रुपये, हैदर नदाफ याच्या खिशातील १५ तर इब्राहिम हुंडेकरी याच्या खिशातील ६ हजार असे एकूण ४७ हजार रुपये काढून घेतले. असे बाबू राठोड यांच्या फिर्यादीत नमूद आहे.
0 Comments