खामगाव येथे शेतीच्या वादातून एकाला लोखंडी गजाने मारहाण; चौघांवर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी:

बार्शी तालुक्यातील खामगाव येथे शेतात येणारे पाणी रोखण्यासाठी ताल टाकत असताना एखादा लाकडी काठी व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

रामलिंग लिंगा भालेकर, (वय ५५) रा खामगाव, ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २३ जुलै रोजी फिर्यादी हे शेतामध्ये पाहणे जाऊ नये म्हणून जे सी बी च्या ताल टाकीत असताना चौघांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या शेजारील शेतकरी १ ) नामदेव विठोबा माळी २ ) बापू नामदेव माळी ३ ) सुदाम श्रीरंग माळी ४ ) हरिशचंद्र सदाम माळी रा. खामगाव ता. बार्शी चौघांनी मिळून मारहाण केली आहे.

प्रतिष्ठित गावकऱ्यांच्या साह्याने आपण हा वाद समोरच्याने मिटू म्हणत असतानाही फिर्यादीला मारहाण केली आहे, या मारहाण चालू झाली असताना जेसीबी वाले पळून गेले. त्यांच्या मुलाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु तेथून पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे पुन्हा ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे दाखल करण्यात आले आहे. वरील चौकादानाविरुद्ध भादवि कलम ३२३,३२४,३४, ५०४,५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments