कुर्डुवाडी! फौजदार पतीच्या घरच्यांकडून विवाहितेचा खून करण्याचा प्रयत्न




कुर्डुवाडी/प्रतिनिधी:

 पोलीस पतीने आपल्या घरच्या मंडळीकडून पत्नीस जबर मारहाण केली आहे. गळा आवळून खून करण्याचं प्रयत्न केला, पोटात लात मारून खाली पाडले आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून घरातून हाकलून दिले असल्याची माहिती विवाहित महिलेने दिली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कुर्डवाडी येथे घडली. 

याबाबत कुर्डवाडी पोलिसांनी फिर्याद देखील घेतली नसल्याची माहिती यावेळी संबंधित विवाहित महिलेने दिली आहे. घरगुती साहित्य घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेस लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. विवाहित महिलेचा पती हा पोलीस खात्यात अधिकारी पदावर कार्यरत आहे.पोलीस पदाचा दुरुपयोग करत त्याने उलट पत्नी व त्याच्या नातेवाईकांविरोधात कुर्डवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर विवाहित महिलेची फिर्याद घेतली नाही.

Post a Comment

0 Comments