दहिटणे शिवारामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे बैलगाडी जप्त करून वैराग पोलीस स्टेशन मध्ये आणून लावली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दहिटणे गावातून मोहोळ ते वैराग जाणारे रोडवर तुळशिदास जाधव यांचे पुतळ्या समोरून रोडवरून एक बैलगाडी अवैद्य वाळू चोरून घेऊन जात आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच आम्ही सदर ठिकाणी गेलो असता मोहोळ वैराग रोडवर दहिटणे गावात असलेल्या तुळशिदास जाधव यांच्या पुतळ्यासमोरून एक बैलगाडी जात असताना दिसली. सदर बैलगाडी चालकास बैलगाडी थांबवण्यास सांगून त्यात पाहिले असता त्यात वाळू मिळून आली. सदर बैलगाडी
चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने आपले नाव संतोष गुंडीबा जाधव रा. दहिटणे ता. बार्शी असे असल्याचे सांगीतले. सदर वाळू बाबत बैलगाडी मालकाकडे वाळूचे परवाना व रयल्टी बाबत विचारणा केली असता त्याने नसल्याचे सांगीतले ती वेळी 14.00 वा. ची होती. सदर बैलगाडीत मुद्देमाल मिळून आला तो खालीलप्रमाणे. 1) 103000/- रु. कि. चे दोन बैल एक बैलगाडी त्यात अर्धा ब्रास वाळू जु. वा. कि. अं. येणेप्रमाणे यात नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने ए.एस.आय. / हळे नेम. वैराग पोलीस ठाणे यांनी बैल व बैलगाडी वाळूसहनपोलीस ठाणेस आणून लावले आहे. आरोपी नामे संतोष गुंडीबा जाधव रा. दहिटणे ता. बार्शी याने शासनाचा कसल्याही प्रकारचा परवाना न घेता अगर रयल्टी न भरता पर्यावरणाचा -हास होतो आहे हे माहिती असतानाही आपले ताब्यातील बैलगाडी दोन बैल बैलगाडी मध्ये अर्धा ब्रास वाळू 103000/- रु. किं. अं. असे अवैद्यरित्या बैलगाडी मध्ये अर्धा ब्रास वाळू घेउन जात असताना मिळून आला. म्हणुन माझी त्याचे विरूध्द सरकारतर्फे भा.द.वि. कलम 379 पर्यावरण संरक्षण अधिनियम 9व 15प्रमाणे फिर्याद आहे.
0 Comments