बार्शी! पानगावमध्ये मतदाना दिवशी ४ ऑगस्टला आठवडी बाजार बंद



जिल्ह्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असून यादिवशी आठवडी बाजार भरविण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केला आहे. 

मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार असेल तर तो होणार नाही. यामध्ये वांगी नं १ (ता. करमाळा), पानगाव (ता. बार्शी), वाघोली (ता. माळशिरस) आणि कडबगाव (ता. अक्कलकोट) या गावांचा समावेश आहे. या गावात ४ ऑगस्ट २०२२ रोजी बाजार भरणार नाही, याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जारी केले आहेत.

Post a Comment

0 Comments