दुःखद! कर्ज कसे फेडायचं या विवांचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या




चंद्रपूर  जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस  होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर हा वाढतच गेला. हे डोक्यावर असलेले कर्ज आता कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविंद्र नारायण मोंढे (वय ४५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील निवासी रविंद्र यांच्याकडे सात एकर जमीन आहे. त्यांनी सेवा सहकारी संस्था मर्यादित चुनाळा येथून शेतीकरीता सत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज उचल करून शेतात कपाशी व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. रविंद्र हा एकुलता एक मुलगा असल्याने घरच्या माताऱ्या आई वडिलांचा सांभाळ वर्षभर शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर करीत होता. मात्र या एक महिन्यात चार वेळा पुराच्या पाण्याखाली शेतपिक आल्यामूळे संपूर्ण पीक उध्वस्त झाले. त्यापूर्वीही दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागले. 

अशातच रवींद्र यांच्या आईला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्याही दवाखान्यात उपचार घेत होत्या. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने बँकेचे कर्ज आणि इतरांकडून हात उसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत रविंद्र होता. याच विवंचनेतून रविंद्रने आपल्या राहते घरी कोणीच नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केली. 

Post a Comment

0 Comments