शिवीगाळ दमदाटी करून लाकडी काटी ने मारहाण बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथील घटना वैराग पोलीस स्थानकात भादवी कलम 324,323,504,506,34 या प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की प्रभाकर बाबू माळी हे उपले दुमाला येथील रहिवाशी असून त्याचा भाऊ उत्त्रेशवर बाबू माळी यांनी प्रभाकर यांच्या घरी जाऊन फिर्यादी प्रभाकर यास आरोपीने आपल्या घराजवळ बोलावून तू अशोक माने याला माझ्या प्लॉट चया शेजारी शेड मारल असे का म्हणाला या कारणावरून फिर्यादी च्या डोक्यात मारून जखमी केले यावेळी फिर्यादी ची पत्नी भांडणे सोडवण्यासाठी आली असता इतर तिघांनी बालाजी उत्तरेशवर माळी,दैवशाला माळी, व कांचन बालाजी माळी यांनी देखील फिर्यादी यांच्या पत्नीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिली याबाबत फिर्यादी प्रभाकर बाबू माळी यांनी उत्तरेश्वर बाबू माळी, बालाजी उत्तरेश्वर माळी, दैवशाला उत्तरेश्वर माळी, कांचन बालाजी माळी या चौघांच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. सदरील घटना दिनांक 2 जुलै 2022 रोजी उपले दुमाला येथे आरोपींच्या घरासमोर घडली सदरील गुन्हा वैराग पोलीस स्थानकात नोंद झाला असून आधीक तपास पदुळे हे करीत आहेत
0 Comments