मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे.
वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या झुंड आणि ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटांतून रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. पण आता रिंकू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. तिचा सैराट मधील एक डायलॉग आता तिला चांगलाच भारी पडणार आहे..
2016 मध्ये आलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा रिंकूचा पहिला चित्रपट. यामध्ये रिंकूने ‘आर्ची’ हे पात्र साकारले होते. या चित्रपट रिंकूने एका बड्या घरातील पण काहीशा रांगड्या मुलीची भूमिका साकारली होती. तिची ग्रामीण बोली, त्यातले ठेहराव, तिचे संवाद याची चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली होती.
यामध्ये तिचा एक डायलॉग सर्वात गाजला तो म्हणजे, ‘ मराठीत सांगितल्यालं कळतय ना, का इंग्रजीत सांगू’ .. या डायलॉगने अक्षरशः धुमाकूळ घातला पण चित्रपटामध्ये इतरांना ‘मराठीत कळत नसेल तर इंग्रजीत सांगू का?’ असं म्हणणाऱ्या रिंकूला खऱ्या आयुष्यात इंग्रजी येतं का? असा प्रश्न समोर आला आहे.
पण या प्रश्नाचं उत्तर लवकरच तुम्हाला मिळणार आहे. कारण झी मराठीवर ‘बस बाई बस’ ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत महिला कलाकार सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जाणार आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री रिंकू राजगुरू सहभागी होणार आहे, त्यामुळे तुमच्या मनातील अनेक प्रश्न तिला यावेळी विचारले जाणार आहे.
नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला असून, बस मधील महिला रिंकूला तू कितवीत आहेस, तुझा बॉयफ्रेंड आहे का, तुला इंग्रजी येतं का, खऱ्या आयुष्यात कुणाला कानाखाली दिली आहेस का, असे प्रश्न विचारताना दिसत आहेत. येत्या 29 जुलै पासून ही गप्पांची भन्नाट मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
0 Comments