सोलापूरकरांच्या हक्काची म्हणून ओळखली जाणारी सोलापूर – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस येत्या सोमवारपासून ( १८ जुलै) दररोज धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
सोलापूर रेल्वे स्थानकावरून १.२५ वाजता सुटणारी गाडी ६.०५ वाजता पुण्यात पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. कोरोना काळात बंद करण्यात आलेली इंद्रायणी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी विविध संस्था, रेल्वे संघटना, लोकप्रतिनिधी व प्रवाशांनी प्रशासनाकडे केली होती.
ही गाडी १८ जुलै २०२२ रोजी पुणे स्थानकावरून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि पुढील स्थानक, दौंड आगमन १०.३३ प्रस्थान १०.३५, जेऊर आगमन ११.३४ प्रस्थान ११.३५, कुर्डुवाडी आगमन १२.०३ प्रस्थान १२.०५, सोलापूर ०१.२५ वाजता पोहोचणार आहे. तर सोलापूर-पुणे एक्सप्रेस सोलापूर स्थानकावरून दुपारी २ वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन २.४७ प्रस्थान २.५०, जेऊर आगमन ३.१९ प्रस्थान ०३.२०, दौंड आगमन ०४.३८ प्रस्थान ०४.४०, पुणे ०६.०५ वाजता पुण्यात पोहोचणार आहे.
दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामामुळे गाडी बंद होती. इंद्रायणी एक्सप्रेस सुरू न करण्याचे कारण सांगितले जात होते. गाडी सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या मागणीचा रेटा वाढला होता. निवेदनेही देण्यात आली होती. या प्रवाशांच्या मागणीचा विचार करीत रेल्वे प्रशासनाने इंद्रायणी एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवार १८ जुलैपासून ही गाडी नियमित धावणार आहे. या गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सोलापूरहून पुणे, मुंबईला दररोज जाणारे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक प्रवास करतात. त्यांना ही गाडी सोयीची ठरत आहे.
0 Comments