राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची निवड करण्यात आली आहे. विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलीचे वडील आणि बाहुबली, बजरंगी भाईजानचे कथालेखक आहेत. पंतप्रधानांनी स्वतः ट्विट करत हि माहिती दिली आहे.
पी टी उषा यांच्या क्रीडाक्षएत्रातील कामगिरीबाबत सगळ्यांनाच माहिती असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर त्यांनी नव्या खेळाडूंनाही मार्गदर्शन केल्याची माहितीही मोदींनी ट्विटमध्ये दिली आहे. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करत, त्यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
इलैयाराजा यांच्या सर्जनशील प्रतिभा पिढ्यानपिढ्या लोकांना भुरळ घालत आहे. त्यांचा जीवन प्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे.
वीरेंद्र हेगडे यांनाही राज्यसभेची उमेद्वारी देण्यात आली आहे. सेवा क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. धर्मस्थळांमधील प्रार्थना, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे असे ट्वीट मोदींनी केले आहे.
0 Comments