सध्या माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद मिळावे घेत आहेत, त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारावर टीकास्त्र हे सोडत आहेत. सध्या आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निशान्यावर असल्याचे दिसत आहेत. शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. 'आदित्य ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. आमच्या सारख्या तीन तीन टर्म आमदार राहिलेल्या पक्ष संघटनेचे काम केलेल्यांना जर गद्दार म्हणत असतील तर दुर्दैव आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भाषा बोलू नये. तुम्ही सुसंस्कृत भाषा बोला. त्यांना संजय राऊतांचा सहवास असल्यामुळे हे ऐकण्यास आम्हाला वाईट वाटतं.' असे शंभुराजे देसाई यांनी म्हटले आहे. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत बाळासाहेबांच्या विचाराची वसा घेऊन आम्ही यापुढेही काम करणारा असेही ते म्हणाले.
0 Comments