पिंक साडीत दिशाचा हॉट लूक, नेटिझन्स म्हणाले…


फिटनेस फ्रिक असलेल्या दिशा पटानीने  इन्स्टाग्रामवर काही साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिने हॉट पिंक कलरच्या साडीत फोटोज शेअर केले आहेत. मोकळ्या केसात आणि साडीमध्ये दिशाचं सौंदर्य आणखी खुलंलेलं दिसतं. अनेक नेटिझन्सनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे.

तर काहींनी तिला तू बिकिनीतचं चांगली दिसतेस, असे मिश्किलपणे म्हटले आहे. दरम्यान ‘एक विलेन रिटर्न्स’ चित्रपटातील ‘दिल’ हे गाणे रिलीज झाले आहे. ‘एक विलेन रिटर्न्स’ चित्रपटात दिशा, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मोहित सुरीचे चित्रपट नेहमीच हटके असतात. तुम ही हो (आशिकी २), गलियाँ (एक खलनायक) असो किंवा हुई मलंग (मलंग टायटल ट्रॅक) असो, त्याच्या चित्रपटाचे संगीत नेहमीच प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये टॉपला असते. आता दिल हे गाणे रोमँटिक नंबर कौशिक-गुड्डू यांनी संगीतबद्ध केलं आहे. राघव चैतन्यने गायले आहे आणि कुणाल वर्मा यांनी लिहिले आहे.

जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया स्टारर एक व्हिलन रिटर्न्स २९ जुलै, २०२२ रोजी जगभरात प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले आहेत. टी-सीरीज आणि बालाजी टेलिफिल्म्स यांनी संयुक्तपणे निर्मिती केली आहे.


Post a Comment

0 Comments