माढा तालुक्यातील वडशिंगे गावातील दोघांवर विद्युत वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी केल्यामुळे बार्शी शहर पोलिसात १३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, भास्कर भानुदास जाधव रा. वडशिंगे यांनी बारा महिन्याच्या काळात १०७२ युनिट वीज अनधिकृतरित्या वापरून कंपनीचे ११,९९८ रुपयाचे नुकसान केले.
तर दुसऱ्या घटनेमध्ये प्रशांत बाळू कदम रा. वडशिंगे ता. माढा यांनी बारा महिन्यांमध्ये १३६९ युनिट वीज अनधिकृतरित्या वापरून १६,८३८ रुपयांचे नुकसान केले. दोघाविरुद्ध सहाय्यक अभियंता मंदार दिलीप राजमाने यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे, पोलिसांनी दोन्ही आरोपीवर भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती १४ जुलै रोजी बार्शी शहर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
0 Comments