महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असून भाजप खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी तीन जणांनी अर्ज केले होते; परंतु काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते-पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने रामदास तडस बिनविरोध निवडून आले.
यामुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या परिषदेवर भाजपने ताबा मिळविला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष होते; परंतु शरद पवार हे अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती.
रामदास तडस हे वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विधानपरिषदेतून दोनदा आमदार झाले आहेत. तसेच रामदास तडस हे नगरपरिषदचे अध्यक्षही होते. त्यानंतर २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एसटी महामंडळाचे संचालक पदही भूषवलेले आहे. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले.
0 Comments