महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने नुकतीच राज्यातील नगरपालिका यांचा निवडणुक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्या अनुशंगाने सोलापूर जिल्हयात आदर्श आचार संहिता जाहिर झालेली आहे. सदर आचार संहितेचे कोटेकोरपण पालन होवून षांतता व भयमुक्त निवडणूका पार पाडण्यासाठी तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे षाखा सोलापूर ग्रामीण यांना जिल्हयात अवैध षस्त्र बाळगणारे लोकांवर कारवाई करण्याबाबत आदेषीत केल आहे.
त्या अनुषंघाने सुहास जगताप पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे षाखा, सोलापूर ग्रामीण यांनी धनयंज पोरे,सहायक पोलीस निरीक्षक यांच्या पथकास अवैध षस्त्र बाळगणारे लोकांबाबत कारवाई करण्याबाबत सुचीत केले होते. त्यावरून सपोनि पोरे यांच्या पथकास अक्कलकोट तालुक्यातील जेऊर भागामध्ये पंजाब राज्यातून एक इसम अवैधपणे तलवारी मागवून घेवून तो सदर भाागातील लोकांना विक्री करत असल्याबाबतची बातमी समजून आली होती. सदर बातमीची पडताळणी करण्यासाठी सपोनि पोरे व पथकाने जेऊर गावात जावून पंजाबमधून तलवारी मागवून विक्री करणारे इसमास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपूस करता त्याने सुरूवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतू त्यास अधिक विष्वासात घेवून तपास केला असता त्याने फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून पंजाब राज्यातून तलवारी मागवून घेतल्या असून सदरच्या तलवारी या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, पानमंगरूळ, करजगी व अक्कलकोट षहरातील तसेच दक्षीण सोलापूर तालुक्यातील बंकलगी गावातील लोकांना विक्री केली असल्याची कबूली दिली.
दहशत निर्माण करण्यासाठी हत्यार वापरणाऱ्या आरोपीची नावे पुढीलप्रमाणे
(१) बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा वय- २५ रा. जेऊर ता. अक्कलकोट
(२) उमेश सुरेश इंडे वय २० रा. बुधवार पेठ, अक्कलकोट .
(३) गौतम अंबादास बनसोडे वय १९ रा. बंकलगी तालुका दक्षिण सोलापूर.
(४) मनपाक सिराज मिरगी वय - २२ रा. पानमंगरूळ ता. अक्कलकोट
(५) राहुल सिद्धाराम हेळवे वय २० रा. करजगी ता. अक्कलकोट
(६) अनिल मल्लिकार्जुन हेळवे वय २१ रा. करजगी ता. अक्कलकोट.
(७) शब्बीर हसन नदाफ रा. बंकलगी ता. दक्षिण सोलापूर.
(८) नागण्णा सुभाष तळवार रा. पानमंगरूळ ता. अक्कलकोट.
(९) रवी सुभाष चव्हाण वय - २३ रा. करजगी ता. अक्कलकोट.
(१०) नबीलाल रजाक मळ्ळी वय १९ रा. पानमंगरूळ ता. अक्कलकोट.
(११) गजप्पा नागप्पा गजा वय- २३ रा. करजगी तालुका अक्कलकोट.
आरोपी कृ ७ व ८ वगळता सर्व आरोपींना ताब्यात घेवून अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणे येथे जमा करण्यात
आले आहे.
त्यावरून सदर तलवारी विकत घेणारे लोकांचा स्थानिक गुन्हे षाखेच्या पथकाने शोध घेतला. सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून जेऊर येथील इसमाकडून विकत घेतलेल्या एकूण 12 तलवारी जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या व लांबी-रूंदीच्या एकूण 26,100/- रूपये किंमतीच्या जप्त करण्यात आलेल्या सदर फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी मागवणारा व विकत घेणारे असे एकूण 11 लोकांविरूध्द अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणेस गु.र.नं.392/2022, भारतीय षस्त्र अधिनियमचे कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि काकडे, अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही मा.श्रीमती तेजस्वी सातपुते(भा.पो.से.),पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण, मा.श्री. हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री.सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे षाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्षनाखाली सपोनि धनंजय पोरे, सहा.फौ. श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर,पोह सलीम बागवान विजय भरले, हरीदास पांढरे, पोना रवि माने सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे षाखा,सोलापूर ग्रामीण यांनी पार पाडली आहे.
0 Comments