बार्शी! आमदार शहाजी पाटील यांना मंत्री करा माजी पंचायत समिती सदस्य धेंडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी आज दिनांक १७ जुलै रविवार रोजी वैराग येथील सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती माजी सदस्य बार्शी संपतराव धेंडे यांनी विविध मागण्यांसाठी तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी निवेदन दिले तसेच युवक मातोश्री रमाई महिला मागासवर्गीय बजिदेशिय संस्थेचे सचिव निखिल ढावरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी निवेदन दिले.
 या संबंधित विषयाबाबत आज त्यांनी त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत दहा मिनिटे चर्चा विनिमय केला, यानंतर त्यांनी शिंदे साहेब यांच्या निवासस्थानाबाहेर रक्षण करत असलेल्या पोलीस बांधवांचा देखील  योग्य कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत, शुभम गोवर्धन, किशोर सोनवणे माढा तालुक्याचे युवक सचिव निखिल ढावरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments