बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावर गोगलगायी व इतर किडीमुळे तसेच संततधार पाऊसामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्वराज्य शेतकरी महासंघाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यात यावर्षी जवळपास ८०% सोयाबीन पिकाची पेरणी पूर्ण झालेली आहे, पण दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आपत्तीने शेतकऱ्यांना पीक हाताशी लागत नाही. वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार केला तर त्याचे आर्थिक गणित नेहमीच नुकसानीत होत आहे.
यावर्षीही सोयाबीन पिकावर गोगलगायी व किडीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक उध्वस्त झालेले आहे, तसेच मागील काही दिवसात संततधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, त्या शेतकऱ्यांचे बियाणे जमीनीतच खराब झाल्यामुळे ते उगवले नाहीत. या दोन्ही कारणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
सोयाबीन पिकावर गोगलगायी व इतर किडीमुळे तसेच संततधारा पाऊस पडल्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी स्वराज्य शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राहुल भड, सचिव दशरथ उकिरडे, रणजीत महानवर, पांडुरंग घोलप, मुलाणी व्ही.ए., शेषेराव शिंदे आदी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
0 Comments