सोलापूर-गाणगापूर बसला अपघात; २० जण जखमी



सोलापूरसोलापूर-गाणगापूर बसला अक्कलकोट- मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली आहे. हा अपघात सकाळी 10.30 च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पण ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्यामुळे उपचारास अडचणी येत आहेत, त्यामुळे खासगी डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण करण्यात आले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी वेळीच अपघातस्थळी पोहचत मदतकार्य सुरू केले आहे.

या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली आहे. हा अपघात सकाळी 10.30 च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Post a Comment

0 Comments