बार्शी येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते विवेक गजशिव यांची वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी दिले.विवेक गजशिव हे वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यापासून पक्षासाठी कार्य करीत आहेत.यापूर्वीही त्यांनी बार्शी शहराध्यक्ष,जिल्हा संघटक,जिल्हा कार्याध्यक्ष अशी पदे भोगली आहेत.पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांचे जिल्ह्यातील विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
राजकारणा सोबत विविध सामाजिक,दुर्लभ,वंचित घटकांचे प्रश्न हाताळत त्यांना न्याय देण्याचे कार्य गजशिव यांनी सातत्याने केले आहे.आगामी बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोणाने ही निवड महत्वाची मानली जात आहे. गजशिव यांच्या राजकीय कौशल्याचा आणि वलयाचा पक्षाला फायदा होणार आहे.यावेळी गजशिव यांनी पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर,युवा नेतृत्व सुजात आंबेडकर,प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर,जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांचे आभार मानत पक्षवाढीसाठी भरीव कार्य करणार असल्याचे सांगितले.
0 Comments