औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत आम्हाला माहित नव्हतं. हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. राष्ट्रवादीच्या व्यासपाठीवार नामांतराबाबत चर्चा झालेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामांतराच्या मुद्दावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. मध्यावधी निवडणुकीबाबात ते म्हणाले, मध्यावधी निवडणुका लागतील, असे मी म्हणालो नव्हतो. अडीच वर्षे राहिली आहेत. २०२४ च्या निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागा, अस मी म्हणलो होतो.
विधानसभा निवडणुका तिन्ही पक्षाने एकत्रपणे लढण्याचा माझी मनस्थिती आहे. परंतु याबाबत अद्याप कोणत्याही पक्षाबरोबर चर्चा झालेली नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर बंडखोरी करणाऱ्या बंडाला आधार नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीवर आरोप करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.
औरंगाबादच्या नामांतरावरून पवार म्हणाले, औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आम्हाला समजलं. यापेक्षा औरंगाबादच्या मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते.
भावनेचा प्रश्न उपस्थित केला नसता तर आनंद झाला असता, याबाबत आमच्या पक्षाच्या व्यासपीठावर याची चर्चा झालेले नाही. आता मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्याने तो मान्य करायला हवा
त्याचबरोबर राज्यपाल यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक वर्षभर घेतली. मात्र आताचे सरकार स्थापन करण्यासाठी, अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी राज्यपालांनी कार्यक्षमता दाखविली आहे, असा शब्दांत राज्यपालांवर पवारांनी निशाणा साधला आहे.
0 Comments