मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवेसनेशी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यावर शिवसेना अॅक्शन मोडवर आली आहे. तर मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे.
शिंदे यांना समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन नेत्यांच्या नियुक्त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज बैठक घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईत शिवसेनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग आणि शाखाप्रमुख यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत विभागवार शिवसेना मजबूत करा असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील विभागप्रमुख्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरू असून काही पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेनेत आता खांदेपालट होणार आहे.
दरम्यान या बैठकीत उद्या होणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबतीतील निर्णयात न्याय मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
काय झालं बैठकीत?
विभागवार पक्ष मजबूत करण्याचे आदेश
अनेक ठिकाणी खांदेपालट होण्याची शक्यता
शिंदे समर्थकांच्या जागी नवीन नेमणुका होण्याची शक्यता
उद्याच्या सुनावणीत न्याय मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.
महापालिका निवडणुकांच्या वॉर्ड रचनेनंतर तयारी कशी करायची यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
येत्या काळात पदाधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात त्यासाठी कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या महापालिकेच्या निवडणुकात शिवसेनेची तयारी कशी असणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
0 Comments