पोलीस ठाण्यातच लाच घेताना लाचलुच प्रतिबंधक पथकाने दोन पोलिसांना ठोकल्या बेड्या



सांगली पोलीस ठाण्यातचं २५ हजारांची लाच घेताना दोघा पोलिसांना बेड्या पडल्या आहेत. जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश बागडी आणि संभाजी कारंडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

जत पोलीस ठाण्याच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.पोलीस नाईक गणेश बागडी आणि संभाजी कारंडे,असे या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जर तेथील एका तक्रारदाराच्या भावाच्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्याप्रमाणे जत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील गाडी सोडण्यासाठी आणि गुन्हे कामी सहकार्य करण्यासाठी पोलीस कर्मचारी बागडी आणि कारंडे या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती,याबाबत तक्रारदारांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 

सदर तक्रारीची पडताळणी केली असता यामध्ये लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झालं होतं. ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते, त्याच ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आल्याच्या घटनेमुळे सांगली पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments