सोलापूर! सोन्याच्या दागिन्यासह तीन लाख रुपये घेऊन तरुणीचे पलायन


मोदी परिसरातील शामा नगर पोलीस वसाहतीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीने घरातील ३ लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने घेवून पळून गेल्याची तक्रार तिच्या वडीलाने पोलीसांकडे केली. मानसी निरजकुमार अग्रवाल (वय २१, रा. शामा नगर पोलीस लाईन शेजारी मोदी) ही मुलगी रंगाने गोरी, अंगावर निळ्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीन्स, डोळ्यावर चष्मा असून तिला हिंदी मराठी भाषा बोलता येते ती दि. १० जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरातील ३ लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने घेवून कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने घरातील तिचे आई वडील आणि इतर नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments