बार्शी तालुक्यातील गौडगाव बस स्थानकात एसटीने दिलेल्या धडकेत महिला गंभीररित्या जखमी झाली होती, हा अपघात एक जुलै रोजी एकच्या सुमारास घडला होता, 3 जुलै रोजी अपघातातील जखमी निलावती भगवान घोंगडे यांचा उपचारादरम्यान सोलापूर सिविल हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे.
महादेव विठ्ठल घोंगडे वय 34 वर्षे रा-उपळे (माकडाचे), ता. जि. उस्मानाबाद 6 जुलै रोजी फिर्याद दाखल केली आहे. एक जुलै रोजी बार्शी ते तुळजापुर जाणारी बस क्र एम एच 14, बी टी 0503 मध्ये बसुन बस गौडगाव ता बार्शी येथे बसस्टॅन्डवर थांबली असता माझी आजी सदर बसमधुन उतरुन गौडगाव बसस्थानकावर जात असताना सदर बस चालकाने बस चालु करुन पुढे घेत असताना सदर बसने निलावती घोंगडे हिस धडक दिलेने ती जखमी झालेने तिचेवर सिव्हील हस्पीटल सोलापुर येथे उपचार चालु असताना दि- 3 जुलै रोजी सकाळी 06/00 वा मयत झाली आहे. तरी माझी सदर बसचा चालक सोनाजी नरहरी मोरे रा- एस टी डेपो बार्शी, जि-सोलापुर याचे विरुध्द तक्रार आहे. त्यांच्यावर भादवी कलम 289 304 ए , 337,338 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 जुलै रोजी वैराग पोलिसांनी ही माहिती प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिली.
0 Comments