मोहोळ/प्रतिनिधी:
वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनपरिक्षेत्र मोहोळ अंतर्गत व्हिडीओच्या माध्यमातून ससा या वन्यप्राण्याची शिकार करुन खाणेचे उद्देशाने या वन्यप्राण्याची कातडी काढत असलेचे निदर्शनास आलेले आहे.
हा व्हिडीओ मौजे पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर हद्दीतील असलेचे समजले. यावरून श्री. सतिश उटगे वनपरिक्षेत्र अधिकरी मोहोळ यांनी व त्यांचे अधिनस्त असलेले क्षेत्रीय कर्मचारी यांचेसह मौजे पोखरापूर गावामध्ये जावून चौकशी केली असता सदर आरोपी 1.) हणमंत विठ्ठल खंदारे वय वर्ष 48. 2.) बिरुदेव विठ्ठल खंदारे वय वर्ष 52 या दोन आरोपींचा चा शोध घेवून सदर आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी करुन त्यांचे विरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2 (16), 2 (36), 9, 44 व 48 (अ), 50.51 अन्वये प्राथमि गुन्हा दाखल करणेत आला. प्रकरणातील वन्यप्राणी ससा हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 मधील अनुसूची IV मध्ये समाविष्ठ आहे, ही कारवाई डी. एम. पाटील उपवनसंरक्षक सोलापूर, एल.ए. आवारे सहा. वनसंरक्षक (रो.ह.यो) सोलापूर, बी. जी. हाके सहा. वनसंरक्षक
(कॅम्पा) सोलापूर, यांचे मार्गदर्शनाखाली सतिश उटगे वनपरिक्षेत्र अधिकरी मोहोळ, एस. जी. जवळगी वनपाल मोहोळ, श्री. एस. आर. कुले वनरक्षक, मोडनिंब, श्री. एस. टी. थोरात वनरक्षक कामती व कायम वनमजुर यांचे पथकाने कारवाई पुर्ण केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास श्री. सतिश उटगे वनपरिक्षेत्र अधिकरी मोहोळ हे करीत आहेत.
0 Comments