सरस्वती गौतम डोळसे वय ४० रा. धामणगाव ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४ लाख २५ हजाराच्या फसवणुकी प्रकरणी आरोपी नितीन देवराव कांबळे रा.थेऊर ता.हवेली जि.पुणे यांच्यावर वैराग पोलिसात कलमं ४२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी आधिक माहित अशी की, बार्शी तालुक्यातील मौजे धामणगाव दु येथील फिर्यादी महिलेकडून आरोपी नितीन याने घर जागेच्या खरेदीसाठी महिलेकडून ४ लाख २५ हजार रक्कम घेतली होती परंतु त्याचा व्यवहार पूर्ण त्या आरोपीने न करता संबंधित महिलेची आणि तिच्या मुलाची फसवणूक केल्याचे समजले यासंबंधी महिलेने वैराग पोलिसात आरोपी विरुद्ध फिर्याद नोंद केली. फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित आरोपीवर वैराग पोलीस स्टेशन येथे भादवी कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोरे हे करीत आहेत.
0 Comments