सोलापूर! प्रवाशाने विष प्राशन केल्याने एसटी बस थेट सिव्हिल हॉस्पिटलला



सोलापूर-कराड डेपोची बस उस्मानाबादला निघाली होती.सोलापूर बस स्थानकातून अनेक प्रवाशी उस्मानाबाद आणि तुळजापूरकडे निघाले होते.मात्र सोलापूर बसस्थानकातून बस निघाली असता,काही अंतरावर एका प्रवाशाने विष प्राशन केले.ही बाब कंडक्टर व ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान साधत एसटी बस थेट सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे वळवली.प्रवाशाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यावर उपचार सुरू केले.सिद्धेश्वर गुरुराज स्वामी(वय 53 वर्ष,द्वारका नगरी,विजापूर रोड, सोलापूर शहर) असे प्रवाशाचे नाव आहे.एसटी महामंडळाचे अधिकारी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

कंडक्टर कांबळे यांच्या लक्षात आले-

कराड डेपोची बस सोलापूर बस स्थानकात गुरुवारी  9 जून रोजी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास दाखल झाली.1.30 वाजण्याच्या सुमारास कराड ते उस्मानाबाद बस सोलापूर बस स्थानकातून निघाली.2 किमी अंतर गेल्यावर मागील सीटवर बसलेले सिद्धेश्वर स्वामी या प्रवाशास मोठा खोकला येत होता आणि बस मध्ये विषारी औषधाचे उग्र वास येत होते.आणि एक प्रवाशी उलट्या करत आहे.ही बाब कंडक्टर जी.एम कांबळे(रा. कराड) यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब सोलापूर बस स्थानक प्रमुखाला माहिती दिली.आणि रुग्णवाहिकेला याबाबत माहिती देऊन बोलावून घेतले.

बस थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वळवली-

प्रवाशी सिद्धेश्वर स्वामी हे सोलापूर हुन तुळजापूरकडे जाण्यासाठी तिकीट काढले आणि मागील सीटवर जाऊन बसले.उस्मानाबादकडे निघालेली बस काही अंतरावर गेली असता कंडक्टरच्या लक्षात आले त्यांनी रुग्णवाहिका बोलावली.मात्र प्रवाशी स्वामी हे ,जाडजूड असल्याने त्यांना बस मधून बाहेर काढता आले नाही,व इतर प्रवाशी या महिला असल्याने ,कंडक्टर आणि चालकाने एसटी बस थेट सिव्हिल हॉस्पिटलला आणली.सिव्हिल हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ,प्रवाशास बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र प्रवाशाची परिस्थिती गंभीरअसून तो सध्या बेशुद्ध आहे.

Post a Comment

0 Comments