बार्शी तालुक्यातील जामगाव येथे अवैधरित्या दारूविक्री होत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली त्या त्यानुसार बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पत्र्याच्या शेडमध्ये प्लास्टिकच्या कॅनमध्ये महिला दारू विक्री करताना आढळून आली पोलिसांची चाहूल लागताच महिलेने त्याठिकाणाहून धूम ठोकली आहे. तिच्या ताब्यातील गावठी दारू पोलिसांनी जप्त करून जागीच नष्ट केली आहे विनापरवाना पत्र्याच्या शेडमध्ये दारू बाळगल्याबद्दल राजकुमारी न्यानेश्वर शिंदे राहणार जामगाव तालुका बार्शी या महिलेवर वैराग पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments