सतर्क रहिये! म्हणत राज ठाकरेंनी दिल्या शिंदेंना शुभेच्छा


 
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर, देवेंद्र फडणवीस  यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्वीट करत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
राज ठाकरे यांनी शिंदेचं अभिनंदन करताना ट्वीटमध्ये म्हटले आहे की, श्री. एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन! असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments